
|| श्री केदारलिंग प्रसन्न ||
केदारनाथा, तुझे वंदू चरण |
भावे स्मरुनि आलो मी शरण ||
कृपादृष्टी राहो, दे हाकेला साद |
असो ठाव हृदयी, दे आशीर्वाद ||
आशीर्वाद राहो, सोंबा-केदारनाथा |
कृपा राहो तुमची, वाघजाई-जुगाई माता ||
वंदन करितो, देवी चव्हाटकरीण माता | सांभाळा तुम्ही, आम्हां सर्व भक्तां ||
|| श्री केदारलिंग प्रसन्न ||
रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख पासून अवघ्या १० कि.मी. अंतरावर वसलेलं काटवली गाव म्हणजे तळ कोकणातील गर्द झाडीत दडलेल्या एखाद्या टुमदार खेड्याचाच अविष्कार आहे. या गावाचे मुख्य ग्रामदैवत श्रीकेदारलिंग हे असून त्यांचे देऊळ गावाच्या पूर्वेला उंच डोंगरमाथ्यावर आहे. श्रद्धा, भक्ती, उपासना या मुल्यांतून या मंदिरात श्री केदारलिंग, सांबा, जुगाई, चव्हाटकरीन, वाघजाई अशा कोरीव मूर्ती प्रतिष्ठापीत झाल्या आहेत. होळी आणि गणपतीचा सण गावात खूप उस्ताहाने साजरे केले जातात.


|| श्री क्षेत्र वेळणेश्वर ||
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात सिंधुसागरतीरी असलेले अतन्त्य रमणीय आणि निसर्ग लावण्याने नटलेले श्री क्षेत्र वेळणेश्वर घाग कुटुंबियांचे कुलदैवत मानले जाते. या गावात घागांचे वतन असून ते या देवस्थानातील प्रमुख मानकरी आहेत. देवस्थानातील धार्मिक सण, विधी सुरु असताना देवस्थानाच्या तिथी-पोवती रिवाजाप्रमाणे घाग बांधवांचा हक्काचा मान असतो. अशा पवित्र स्थानाला घाग कुळातील बांधव श्रावण महिन्यात आयोजित केलेल्या महारुद्राभिषेक कार्यक्रमाला आवर्जून जातात.


|| श्री क्षेत्र मार्लेश्वर ||
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात देवरुख जवळ असलेले मारळ गावातील श्री स्वयंभू शंकराचे स्थान आहे. मकर संक्रातीच्या दिवसातील श्री मार्लेश्वराची यात्रा म्हणजे शिवभक्तांसाठी मोठी पर्वणी असते. मकर संक्रातीच्या दिवशी होणारा श्री मार्लेश्वाराचा आणि गीरीजादेवीचा विवाह सोहळा म्हणजे मारळ ग्रामस्थांसाठी ख़ुशी आणि उस्ताहाचे क्षण घेऊन येतो. बाव नदीवर असलेला धारेश्वर धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचे अजून एक वैशिष्ट !!!
।। श्री क्षेत्र गणपतीपुळे ।।
रत्नागिरीमधील सर्वात जुने, स्वयंभू , जागृत देवस्थान म्हणजे श्री क्षेत्र गणपतीपुळे !!! दररोज हजारो भाविक या पावन क्षेत्राला भेट देऊन "श्रीं" चा आशीर्वाद घेऊन येथील आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद लुटतात. येथील आरे-वारे बीच , जयगड किल्ला , पावस मठ , मालगुंड - गायवाडी बीच हि येथील काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत, जेथे निसर्ग तुम्हाला भरभरून आनंद देतो. श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे आल्यावर, वरील ठिकाणी भेट देऊन तुम्ही तुमच्या भेटीचा आनंद द्विगुणित करू शकता. हि सर्व ठिकाणे , श्री क्षेत्र गणपतीपुळे पासून १०-१२ किमी अंतरावर आहेत.


|| कुलस्वामिनी श्री भैरी भवानी आईची आरती ||
आपल्या काटवली गावाचे सुपुत्र श्री. संतोष गोरखनाथ घाग (CA) लिखित आणि पल्लवी कासार -गवळी यांनी स्वरबद्ध केलेली श्री भैरी भवानी मातेची आरती...
निर्मिती - स्वरदा म्युझिक अॕकेडमी
गीत व संगीत - श्री. संतोष गोरखनाथ घाग (CA)
स्वर - पल्लवी कासार -गवळी
कोरस - राशी आणि ऋता गवळी
संगीत संयोजक - सुनील गावकर
व्हिडीओ एडिटर - अभिजित हरळीकर
विशेष आभार - विश्वस्त मंडळ श्री क्षेत्र कालभैरव जोगेश्वरी मंदिर
स्थळ - कसबा, संगमेश्वर

|| सर्वे घेऊनी उभी आहे श्री केदारलिंगाणा ||
श्री ग्रामदेवता काटवली यांना वंदन करून सादर करीत आहोत
गीत - सर्वे घेऊनी उभी आहे श्री केदारलिंगाणा
गीत रचना व गायक - शाहीर श्री अशोक घवाळी
कोरस - कपिल नार्वेकर, प्रज्योत पांचाळ
सौजन्य - श्री चेतन मेस्त्री
रेकॉर्डिंग - श्री स्वामी समर्थ कलामंच साखरपा, सई लाईव्ह रेकॉर्डिंग स्टुडिओ
ढोलकी - सिद्धेश साळवी
ऑर्गन - गणेश नार्वेकर
पॅड - स्वप्निल साळवी, संतोष जोयशी
व्हिडिओ - गौरी फोटोज स्टुडिओ ठाकुर्ली (डोंबिवली) विजय घाग बंधु (9819600860)
स्थळ - काटवली, संगमेश्वर

|| माझ गाव काटवली ||
ओढ कोकणाची प्रस्तुत
निर्मित - अनिकेत आंब्रे
गायक - अजय भायजे
कोरस - दिव्या भायजे, सूरज जोगळे
गीतकार - सुरज जोगळे
व्हिडिओ ग्राफर - ओमकार जाधव
विशेष सहकार्य - रवी राईन, चंद्रकांत आंब्रे, विकास लांबोरे बुवा, दिलीप आंब्रे, पांडुरंग आंब्रे, प्रतिक गुडेकर,दिनेश चौगुले, ऋतिक राईन, तेज आंब्रे, अभिषेक आंब्रे
स्थळ - काटवली, संगमेश्वर
