आपल्या काटवली गावाविषयी...

रत्नागिरी जिल्ह्यतील संगमेश्वर तालुक्यातील काटवलीचा ग्रामदेव सदैव जागृत आणि नवसाला पावणारा !!! संगमेश्वर तालुक्यातील पंचक्रोशीत सर्वात मोठे आणि विविधतेने नटलेले गाव म्हणजे काटवली !!!

देवरुखपासून सुमारे १० किमी अंतरावर असलेल्या या गावावर निसर्गाचा वरदहस्त नेहमीच लाभला आहे. परमेश्वराने स्वतःच्या निवासासाठी या गावाची निवड केली, त्याला कारणही तसेच आहे. काटवली हे गाव डोंगर दरीत वसलेले, झाडे, झुडपे, वेली, शेती-भाती यांच्या बहाराने नटलेले, परमेश्वराने मनस्वी होऊन अतिशय प्रेमाने आणि मुक्त हस्ताने नितांत सुंदर निसर्ग सौंदर्याची स्वछंद उधळण केलेले एक टुमदार गाव !

आपल्या गावाचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे होळी सणातील पालखी स्पर्धा !!! आपल्या काटवली सुपुत्रांनी रत्नागिरी जिल्ह्यतील बहुतेक गावी जाऊन आपले पालखी कौशल्य दाखविली आहेत आणि मानाची पारितोषिके देखील मिळविली आहेत.

काटवली गावातील १२ वाड्या

१) खालची घागवाडी ७) ब्राह्म्णवाडी

२) वरची घागवाडी ८) तळेवाडी

३) गुरववाडी ९) राईनवाडी

४) ढोसलवाडी १०) पाड्याळवाडी

५) गेलयेवाडी ११) धनगरवाडी

६) सुतारवाडी १२) बौद्धवाडी